औरंगाबाद- जिल्ह्यातील 16 लाख मतदार खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर नाराज असून त्यांचा पराभव निश्चित असल्याने औरंगाबाद लोकसभा लढविण्याकरिता इच्छुकांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांनी पुन्हा खैरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
गेल्या काही दिवसांपासून खासदार खैरे व
आमदार चव्हाण यांच्यात सतत शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे. आज शुक्रवारी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्ह्यात होणाऱ्या परिवर्तन यात्रेसंबंधी
माहिती देण्याकरीता आयोजित पत्रकार परिषदेत देखील चव्हाण यांनी पुन्हा खासदार खैरे
यांच्यावर निशाणा साधत शून्य कामे करूनही खैरे पाचव्यांदा लोकसभा लढवत आहेत.
म्हणजे ही त्यांची हिम्मत आहे. दुसरीकडे
गेल्या अनेक वर्षांच्या अडचणी समस्या जशाच्या तशाच आहेत. एकूणच जनतेची अपेक्षा
पूर्ण करण्यात खासदार खैरे हे अपयशी ठरले असल्याची प्रतिक्रिया जनतेतून ऐकायला
मिळते. किंवा जनतेचेच असे म्हणणे आहे. शहरात तर कचरा व समांतर ही त्यांनी आणले. या
कचरा कोंडी फोडण्या करीता उपक्रम करण्यात येत आहेत. याची चौकशी व्हायला हवी असे सांगत
जिल्ह्यातील सोळा लाख मतदार खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे
खैरे यांचा पराभव निश्चित असल्याने औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून निवडणूक
लढविणाऱ्या इच्छुकांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चव्हाण म्हणाले.